मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Fake Branded Cloths Pune | बनावट ब्रँडेड कपडे विक्रेत्यावर कारवाई : दिवाळीत कापड दुकानदारांची धाकधूक वाढली

Action on fake branded cloths pune

M
mubarak

1 मिनिट वाचन

fake branded cloths

  • गुन्हे शाखेची कारवाई, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • ५ लाखांचे बनावट कपडे जप्त
  • पुणे, दि. २१ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी

    Fake Branded Cloths Pune | दिवाळीच्या Diwali सणासुदीत बनावट ब्रँडचे कपडे विक्रेत्यांवर पुणे पोलीस गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामुळे बनावट कपडे विक्री करून ग्राहकांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोणीकंद हद्दीतील एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली असून तब्बल ५ लाख रुपयांचा बनावट कपड्यांचा माल जप्त करण्यात आला आहे. Fake Branded Cloths Pune

    साई ब्रँड होम, केसनंद फाटा, वाघोली पुणे येथे बनावट ब्रँडचे कपडे विक्री केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

    दि. २० ऑक्टोबर रोजी एका कंपनीचे प्राधिकृत अधिकारी यांनी याबाबत तक्रार नोंदविली होती. Action on Fake Brand Pune

    संशयित विक्रेता गौरव सत्यवान नरवाडे, वय २७ वर्षे, रा. वाघोली, तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या साई ब्रँड होम, केसनंद फाटा, वाघोली पुणे येथे कंपनीचे बनावट कॉपीराईट कपडे विक्री होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली असता कपड्याचे दुकानांमधून व त्याचे गोडाऊन मधून एकूण 4,94,650/- रुपये कि. चा कॉपीराईट केलेला बनावट माल (शर्ट ) जप्त करण्यात आला. सदर बाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नंबर 990/2024 कॉपी राईट ॲक्ट 1957 चे कलम 51,63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे , पो.उप.आयुक्त गुन्हे, निखील पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त, राजेन्द्र मुळीक , पोलिस निरीक्षक, युनिट ४.अजय वाघमारे , पोलीस निरीक्षक युनिट ६ वाहेद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मदन कांबळे, युनिट ६ पो.उप.नी. दिगंबर चव्हाण युनिट ४ व युनिट ६ व ४ कडील अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे.

    हेही वाचा: Raj Thackeray for Maharashtra Legislative Assembly : राज ठाकरेंनी आणखी दोन उमेदवारांचे नावे केले जाहीर

    शेअर करा