मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक: पं. उपेंद्र भट

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- २९२६’ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक: पं. उपेंद्र भट

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- २९२६’ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

निलेश राऊत
पुणे: गायन करताना केवळ इतरांचे अनुकरण करून गाणे सादर करणे पुरेसे नसून, गाण्यांतील भाव समजून ते श्रोत्यांच्या मनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य व ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट यांनी केले.

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित २४ व्या ‘पुणे आयडॉल’ गायन स्पर्धेचे उद्घाटन पं. उपेंद्र भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ही स्पर्धा दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, सोमेश्वर फाउंडेशच्या अध्यक्षा तसेच माजी नगरसेविका स्वाती निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका मयुरी कोकाटे, बिपिन मोदी, वसंतराव जुनवणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, तसेच स्पर्धेचे परीक्षक जितेंद्र भूरूक व मनीषा निश्चल आदी मान्यवर उपस्थित होते.

पं. उपेंद्र भट म्हणाले की, गायन ही परिवर्तन घडवणारी प्रभावी कला असून त्यामध्ये अर्थपूर्णता असणे आवश्यक आहे. केवळ हौस म्हणून गाणाऱ्यांनीही शास्त्रीय गायकीचा भक्कम पाया आत्मसात करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी पं. भीमसेन जोशी, किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले व लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘रस बरसत अमृत वेणा’ हे युगुलगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या संगीतप्रेमाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, संगीत ही समाजात सकारात्मक बदल घडवणारी कला आहे. प्रत्येकाने व्यावसायिक गायक होणे शक्य नसले तरी गायनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. “शंभर भाषणांपेक्षा एक गाणे अधिक प्रभावी ठरते,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी अधोरेखित केला.

प्रास्ताविकात स्वाती निम्हण यांनी सांगितले की, ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यात ही स्पर्धा ‘महाराष्ट्र आयडॉल’ म्हणून विस्तारेल, असा विश्वास आहे. ही स्पर्धा नवोदित गायकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या स्पर्धेत मृणाल देशपांडे (वय ४) आणि अमर गोसावी (वय ८०) यांचा सहभाग विशेष ठरला आहे. नागपूर, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर व मुंबई आदी भागांतून एकूण ५६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. तीन दिवस प्राथमिक फेरी पार पडणार असून त्यानंतर अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभात मान्यवरांचे स्वागत उमेश वाघ यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमित मुरकुटे यांनी केले. जितेंद्र भूरूक आणि सपना छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले.

शेअर करा