मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Esha Deol : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा! ईशा देओलकडून सत्य समोर

• Dharmendra Health Condition Update : " वडिलांची प्रकृती स्थिर, काळजी करू नका" - ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर दिली माहिती

V
Vivek

1 मिनिट वाचन

Esha Deol : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा! ईशा देओलकडून सत्य समोर

•Dharmendra Health Condition Update : "वडिलांची प्रकृती स्थिर, काळजी करू नका" - ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर दिली माहिती

मुंबई :- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक बातम्या येत असताना, त्यांच्या निधनाबद्दलची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. ही अफवा पसरताच देओल कुटुंबियांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर, धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

ईशा देओलनं आज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

"वडिलांचं (धर्मेंद्र) निधन झालेलं नाही, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही," असं तिने स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत.ईशा देओलने दिलेल्या या अपडेटमुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : दोन गटातील वादात 'गैरवर्तन' भोवले! ओशिवरा पोलीस ठाण्याचे 2 अधिकारी निलंबित, 5 पोलिसांची चौकशी

शेअर करा