मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Emiway Bantai : एमिवे बंटाईला 1 कोटीची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी!

Emiway Bantai News : सिद्धू मूसेवालाला अर्पण केलेल्या गाण्याच्या आदल्या दिवशी एमिवे बंटाईला धमकी,कनडातील 'गोल्डी बरार'चा दावा, अमेरिकास्थित गुन्हेगारी जाळ्याचाही उल्लेख

V
Vivek

1 मिनिट वाचन

Emiway Bantai

Emiway Bantai News : सिद्धू मूसेवालाला अर्पण केलेल्या गाण्याच्या आदल्या दिवशी एमिवे बंटाईला धमकी,कनडातील 'गोल्डी बरार'चा दावा, अमेरिकास्थित गुन्हेगारी जाळ्याचाही उल्लेख

नवी मुंबई :- भारतीय रॅप विश्वातील एक तेजस्वी नाव… एमिवे बंटाई! पण ‘ट्रिब्यूट टू सिद्धू मूसेवाला’सारखं हृदयस्पर्शी गाणं रिलीज करताना त्याच्या आयुष्यावरच संकट कोसळलं! गाण्याच्या आदल्या रात्रीच त्याला धमकीचा मेसेज आला — "24 तासात 1 कोटी द्या, नाहीतर जीव जाईल!"

ही धमकी बंटाई रेकॉर्ड्सच्या नावाने नोंदवलेल्या अधिकृत मोबाइल नंबरवरून आली. संदेश पाठवणाऱ्याने स्वतःला कनडास्थित कुख्यात गँगस्टर गोल्डी बरार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, अमेरिकास्थित रोहित गोदारा या गुन्हेगाराचाही उल्लेख करत, एमिवेच्या जीवनावर संकट निर्माण केले.

या प्रकारानंतर नेरुळमधील रहिवासी एमिवेने एनआरआय कोस्टल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून क्राईम ब्रँचची टीमही तपासात उतरली आहे.

मूसेवाला हत्या प्रकरणाशी धागेदोरे?
29 मे 2022 ला मानसा, पंजाब येथे सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली होती. या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले होते. गोल्डी बरारनेही हत्या स्वीकारल्याचा दावा केला होता.

आता, सिद्धूच्या स्मृतीत गाणं तयार करणाऱ्या एमिवेवरच जीवघेणा डाव? कोण रचतंय ही कटकारस्थानं? आणि का?

पोलिस तपास यावर प्रकाश टाकतो का, याकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा: Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या मुलावरचा वाद थंडावा; महिलेकडून जोरदार खुलासा – “सर्व आरोप मागे घेतले”

शेअर करा