मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Elections 2024: मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचे नाव न घेता मिलिंद देवरा यांच्यावर टीका

Sandip Deshpande Target Milind Devora : राजकुमाराला माश्यांच्या सुगंध ही सहन होत…..

V
Vivek

1 मिनिट वाचन

Elections 2024: मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचे नाव न घेता मिलिंद देवरा यांच्यावर टीका

Sandip Deshpande Target Milind Devora : राजकुमाराला माश्यांच्या सुगंध ही सहन होत….. संदीप देशपांडे यांचे ट्वीट

मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या Elections 2024 तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराची धुमाळी जोरात होऊ लागली आहे. यंदाच्या निवडणूक तिरंगी होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि मनसेचा सामना यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदार संघात उमेदवार एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोच्या मालिका चालू आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत हॉट सीट ठरलेली माहीम आणि वरळी विधानसभेची जागा यावरून अनेक राजकीय रंग चढले असतानाच वरळी विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी नाव न घेता मिलिंद देवरा Milind Devora आणि आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्यावर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वरळी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचा विजय झाला होता. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री म्हणूनही कारभार पाहिला होता. यंदाची वरळी विधानसभेची निवडणूक तिरंगी होणार असून यामध्ये शिंदे गटाकडून राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा तसेच शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता एक ट्विट करत विरोधकांवर टीका केली आहे. मिलिंद देवरा यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे म्हणाले की ज्या मलबारीलच्या राजकुमाराला माश्यांच्या सुगंधही सहन होत नाही तो म्हणतो मी कोळीवाड्याचा विकास करणार? संदीप देशपांडे यांच्या ट्विट मधून मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यक्रमाच्या सोहळ्या दरम्यान मिलिंद देवरा यांनी वरळीतील प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन येथील कोळी बांधवांना न्याय मिळवून देणारा असल्याचे बोलले होते. त्याच्या अनुषंगाने देशपांडे यांनी ट्विट केले आहे असे म्हटले जाते.

हेही वाचा: Sanjay Raut : भाऊ सुनील राऊतवर एफआयआर दाखल झाल्यानंतर संजय राऊत संतापले, म्हणाले- आम्ही त्याचा पूर्ण हिशेब चुकता करू!

हेही वाचा: Kolhapur News : कोल्हापुरात राजकीय गदारोळ, शाहूजी महाराजांची सून मधुरिमा यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एमव्हीएवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शेअर करा