मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Shinde : "डिनोने तोंड उघडलं, तर अनेकांचा ‘मोरया’ होईल!" — एकनाथ शिंदेंची विधानसभेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Eknath Shinde On Uddhav Thackeray “सिमेंट काँक्रीटचे रस्ते, कोस्टल रोड आमचं काम बोलतंय; तुमचं भ्रष्टाचार झाकतोय”

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Shinde

  • Eknath Shinde On Uddhav Thackeray “सिमेंट काँक्रीटचे रस्ते, कोस्टल रोड आमचं काम बोलतंय; तुमचं भ्रष्टाचार झाकतोय”
  • मुंबई | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि जहाल शब्दांत टीका केली. “डिनो मोरियाने जर तोंड उघडलं, तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल,” असं म्हणत शिंदेंनी गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना इशाराच दिला.

    शिंदे म्हणाले, “सिमेंट काँक्रीटचे रस्ते 25 वर्ष दुरुस्तीविना टिकतात, मग दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली कोणी पैसे उकळले? आम्ही ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ चालवलं, पण तुमचे लोक तिजोऱ्या धुत होते.” मिठी नदीतील कामात डिनो मोरियाचा सहभाग विचारत त्यांनी सूचकपणे ‘डिनो’वरून अनेकांचे बिंग फुटण्याचा इशारा दिला.

    याच भाषणात शिंदे यांनी ठाकरेंच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटलं, “जे खुद शीशेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगड फेकू नये. आम्ही कोस्टल रोड पूर्ण केला, सिमेंट रस्त्यांचे काम केलं, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा मिळवला. पण तुमच्या काळात पालिकेला सोन्याची अंडी देणारी हसवणूक समजून बड्या लोकांनी तिचा वापर केला.”

    “पत्राचाळ घोटाळा, खिचडी कंत्राट, बॉडी बॅग प्रकरणं कुणाच्या काळात झाली? गिरणी कामगार, सफाई कामगारांचे प्रश्न सोडवणं आमचं उद्दिष्ट आहे,” असं सांगत शिंदे यांनी आपली बाजू मांडली.राज्याचं अधिवेशन जसजसं पुढे सरकत आहे, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी चांगलीच उफाळून येत आहे.

    हेही वाचा: Vikhroli MNS Rada : विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांचा राडा! 'व्हाट्सअप स्टेटस' वरून परप्रांतीय तरुणाला मारहाण

    शेअर करा