मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Shinde : विधानपरिषद निवडणूक निकालावरील भाजपच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्ट स्पष्टीकरण; मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावरही भाष्य

•"शिवसेनेने नेहमीच युतीधर्म पाळलाय; पूर्णेकर प्रकरणावरून राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी."

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Shinde

•"शिवसेनेने नेहमीच युतीधर्म पाळलाय; पूर्णेकर प्रकरणावरून राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी."

मुंबई :- राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने योग्य ती मदत केली नसल्याचा व युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजप प्रवक्त्यांकडून करण्यात आला होता. या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेने नेहमीच प्रामाणिकपणे युतीधर्म पाळला आहे. चार ठिकाणी भाजपसोबत युती होती, तर पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत आणि भाजप असा मैत्रीपूर्ण सामना झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर आणि ठाण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात नाव जोडले गेल्यामुळे आणि यावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाला त्रास होऊ नये म्हणून ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आपल्याकडे पाठवल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. पूर्णेकरांची हत्या दुर्दैवीच आहे, परंतु या दुःखावर बाहेरून येणारे लोक राजकारण करत असल्याचा घणाघात त्यांनी केला. ठाण्याबाहेरून येणारे लोक शहरात अशांतता पसरवून ठाणेकरांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष व जलद तपास सुरू असून कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले.

हेही वाचा: Aaditya Thackeray: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाण्यात वातावरण तापले; आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

शेअर करा