मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

Eknath Shinde Latest News : एका आठवड्यात शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा; 'इंडिया' आघाडीची बैठक आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय टायमिंगची चर्चा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Shinde

Eknath Shinde Latest News : एका आठवड्यात शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा; 'इंडिया' आघाडीची बैठक आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय टायमिंगची चर्चा

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागे मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी बुधवारी दिल्लीला जाणार असतानाच, त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde हे आज रात्री अचानक दिल्लीला रवाना होणार आहेत. एकाच आठवड्यात शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा दिल्लीला पोहोचणार असून, उद्या दिवसभर त्यांच्या विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये ते त्यांच्या पक्षाच्या खासदारांसोबत आगामी रणनीतीवर चर्चा करणार आहेत. विशेषतः, शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या रात्रीच्या दिल्ली भेटीने राज्यात मोठी खळबळ उडवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच होत असलेल्या या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

शेअर करा