मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

E challan : ई-चलन दंडांवरून ट्रान्सपोर्ट संपाचा 'ब्रेक'!

Transporter strike : 1 जुलैपासून राज्यभर मालवाहतूक 'चक्का जाम'; शालेय बस संघटनांचा 2 जुलैपासून संप

V
Vivek

1 मिनिट वाचन

E challan : ई-चलन दंडांवरून ट्रान्सपोर्ट संपाचा 'ब्रेक'!

Transporter strike : 1 जुलैपासून राज्यभर मालवाहतूक 'चक्का जाम'; शालेय बस संघटनांचा 2 जुलैपासून संप

मुंबई | राज्य सरकारच्या ई-चलन प्रणालीमुळे वाढत्या दंडात्मक कारवायांविरोधात अखेर वाहनचालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून सर्व मालवाहतूक संघटनांनी चक्काजाम आंदोलनाचा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय बस सेवा पुरवणाऱ्या संघटनांनीही 2 जुलैपासून अनिश्चित काळासाठी संप जाहीर केला आहे.

वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या अकारण दंडात्मक कारवाया, सीसीटीव्ही व वेबरेडरवर आधारित ई-चलन प्रणाली आणि शाळेच्या गेटवर कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून संतप्त झालेल्या संघटनांनी आंदोलनाची तयारी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, शासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे आणि ई-चालानच्या नावाखाली शोषण सुरू आहे.

मालवाहतूक व शालेय बसचालकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत

शाळा बस सेवा नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांवर दंड लावू नये, चुकीच्या चलनांची रद्दीफ करण्यात यावी, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारवायांवर नियंत्रण असावे आणि शासन, पोलीस, RTO, तसेच संघटनांचा समावेश असलेला संयुक्त टास्क फोर्स त्वरित स्थापन करण्यात यावा.

महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर ही लढाई अनिश्चित काळासाठी चालेल आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होईल."

शेअर करा