मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : फराळाच्या साहित्याचे दर वाढले; यंदा दिवाळीचा खर्च वाढणार

Pune News :पुणे : दिवाळीचा फराळ म्हटला की चकली, चिवडा, लाडू आणि करंजीची लगबग सुरू होते.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

फराळाच्या साहित्याचे दर वाढले; यंदा दिवाळीचा खर्च वाढणार
फराळाच्या साहित्याचे दर वाढले; यंदा दिवाळीचा खर्च वाढणार

Pune News :पुणे : दिवाळीचा फराळ म्हटला की चकली, चिवडा, लाडू आणि करंजीची लगबग सुरू होते. मात्र, यंदा या गोडधोडाचा खर्च वाढणार आहे. कमी पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि बाजारातील आवक घटल्याने फराळासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा दिवाळी साजरी करताना सर्वसामान्यांना खर्चाचे गणित जुळवावे लागणार आहे.https://maharashtramirror.com/Pune News

फराळासाठी लागणारे तेल, तूप, धान्य आणि सुकामेवा महागल्याने घरगुती फराळाचा खर्च वाढणार आहे. विशेषतः बदाम आणि काजूच्या दरवाढीमुळे लाडूंसह इतर गोड पदार्थ महाग पडतील. खोबऱ्याचे दर प्रतिकिलो ४०० रुपयांच्या पुढे गेल्याने करंजी आणि चिवड्याचा खर्चही वाढला आहे. गॅसच्या व्यावसायिक दरात झालेली वाढ ही फराळ तयार करणाऱ्यांसाठी आणखी एक आर्थिक आव्हान ठरणार आहे. फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना खरेदीचे नियोजन करावे लागणार आहे. काही कुटुंबे पदार्थांची संख्या कमी करण्यास, तर काही तयार फराळाऐवजी घरगुती फराळाला प्राधान्य देण्यास पसंती देऊ शकतात.https://maharashtramirror.com/Pune News

“यंदा पावसात घट झाल्याने उत्पादन आणि बाजारातील आवक कमी झाली आहे. मात्र, मागणी कायम असल्याने फराळाच्या साहित्याचे दर वाढले आहेत. दिवाळीपर्यंत ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे,” मुकेश गोयल बाजारतज्ज्ञ , व्यापारी, माके्रटयाडर्.

वस्तू

२०२५ मधील दर

जीवनावश्यक वस्तूंच्या दरातील वाढ
वस्तू

जुने दर

२०२६ मधील दर

दरातील वाढ

साखर (प्रति किलो)

₹३९–४०

₹५५–५६

₹१५–१७

पामतेल (१५ किलोचा डबा)

₹२,२५०–२,३००

₹२,६५०–२,७००

₹३५०–४५०

तूप (१५ किलोचा डबा)

₹२,३००–२,३५०

₹२,६५०–२,७००

₹३००–४००

पोहे (प्रति किलो)

₹४२–४५

₹५०–५५

₹५–१३

कोलम तांदूळ (प्रति किलो)

₹४५–५०

₹६०–६५

₹१०–२०

बदाम (प्रति किलो)

₹६००–८००

₹१,१००–१,३००

₹३००–७००

काजू (प्रति किलो)

₹८००–१,०००

₹१,२००–१,४००

₹२००–६००

व्यावसायिक गॅस सिलिंडर

₹१,६५०

₹२,८५०

₹१,२००

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा