मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा!

Disha Salian Death Case: राऊत-पवारांचा भाजपवर हल्ला; 'खोटारडे आरोप, आता माफी मागा'

V
Vivek

1 मिनिट वाचन

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा!

Disha Salian Death Case: राऊत-पवारांचा भाजपवर हल्ला; 'खोटारडे आरोप, आता माफी मागा'

मुंबई | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. Disha Salian Death Case या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असून, त्यास कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिशाच्या मृत्यूबाबत भाजप आमदार नितेश राणे आणि तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार व खून झाल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत स्पष्ट केलं की, तिच्या शरीरावर कोणताही लैंगिक अथवा शारीरिक अत्याचार झाल्याचे पुरावे नाहीत. तिचा मृत्यू डोक्याला लागलेल्या जबर मारामुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय, या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही थेट पुरावे नाहीत, असं पोलिसांनी नमूद केलं.

या अहवालावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “नितेश राणे व फडणवीस यांनी आता नाक घासून माफी मागावी. खोटे आरोप करून जनतेला व भ्रमित केलं गेलं.” दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांवर आरोप करत म्हटलं की, "हे सर्व खोटे आरोप निवडणुकीच्या राजकारणासाठी होते. आता सरकारने अशा खोटारड्या आरोपांवर कारवाई करावी."

दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, "पोलिसांकडून पुराव्यांच्या आधारेच तपास केला जातो. या प्रकरणात पोलिसांनी न्यायाधिष्ठित भूमिका घेतल्यामुळे विरोधकांची दिशाभूल करणारी वक्तव्यं आता थांबतील."

शेअर करा