मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण; न्यायालायने निकाल ठेवला राखून

Mumbai News : मुंबई - उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंधित याचिकेवरील अंतिम सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनवणी पूर्ण न्यायालायने निकाल ठेवला राखून
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनवणी पूर्ण न्यायालायने निकाल ठेवला राखून

Mumbai News : मुंबई - उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंधित याचिकेवरील अंतिम सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सुदीप पासबोला यांनी याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. या युक्तिवादात केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांची मुले निलेश आणि नितेश राणे यांचा उल्लेख झाला असल्याचे समोर आले आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सुनावणी सुरु असताना न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. https://maharashtramirror.com/ Mumbai News
पण, या टप्प्यावर न्यायालय कोणताही अंतिम निष्कर्ष काढत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. उपलब्ध कागदपत्रांमधील काही बाबींची सखोल छाननी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारीही सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद पाहायला मिळाला. दरम्यान, राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला काही रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे बघतो असे न्यायालयाने म्हटल्यामुळे शुक्रवारी राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला काही रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे बघतो असे न्यायालयाने म्हटले होते.

शेअर करा