मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : “माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही” आदित्य ठाकरे

Mumbai News : मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाणार आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही” आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया
माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही” आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया

Mumbai News : दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया


Mumbai News : मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दोन सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय देत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय चर्चांनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “या साऱ्याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. माझं याच्याशी काही देणं-घेणं नसताना मी यावर प्रतिक्रिया का नोंदवावी?” भाजपाकडून या प्रकरणात आरोप केले जात असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी भाजपावर टीका केली.https://maharashtramirror.com/ Mumbai News

मला बदनाम करण्याचा प्रयत्न


“भाजपा प्रत्येकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. त्यांनी राहुल गांधींना मागील अनेक वर्षांपासून ‘पप्पू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. ते मागील सहा वर्षांपासून माझी बदनामी करत आहेत. जो कोणी भाजपाविरुद्ध बोलतो, त्याला ते लक्ष्य करतात,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, उच्च न्यायालयाने दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासासाठी अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि मालवणी पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवावीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पुरेसे पुरावे नसताना कोणालाही आरोपी ठरवू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
दिशा सालियन प्रकरण
दिशा सालियन यांचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी हा मृत्यू अपघाती असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या वडिलांनी २०२५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नव्याने तपासाची आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता सीबीआयच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा