मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Disha Patni Firing News : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार; 'गोल्डी ब्रार गँग'ने घेतली जबाबदारी

Disha Patni Latest Firing News Update : 'सनातन धर्माचा आणि संतांचा अपमान केल्याचा' आरोप, सोशल मीडियावर धमकावणारी पोस्ट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Disha Patni Firing News : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार; 'गोल्डी ब्रार गँग'ने घेतली जबाबदारी

Disha Patni Latest Firing News Update : 'सनातन धर्माचा आणि संतांचा अपमान केल्याचा' आरोप, सोशल मीडियावर धमकावणारी पोस्ट

ANI :- बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या बरेलीतील घरावर शुक्रवारी (13 सप्टेंबर) पहाटे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर लगेचच सोशल मीडियावर 'रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँग' नावाच्या अकाउंटवरून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. कथितपणे प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्यामुळे हा हल्ला घडवून आणल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पहाटे 4.30 वाजता गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथील दिशा पाटनीच्या घराबाहेर पहाटे 4.30 वाजता दोन वेळा हवेत गोळीबार झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

सोशल मीडियावरील धमकावणारी पोस्ट

गोळीबारानंतर तात्काळ, 'रोहित गोदारा गोल्डी ब्रार' नावाच्या फेसबुक अकाउंटवर एक हिंदीमध्ये पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये, "खुशबू पाटनी/दिशा पाटनीच्या घरावर (व्हिला नंबर 40, सिव्हिल लाईन्स, बरेली, यू.पी.) झालेला गोळीबार आम्ही घडवून आणला आहे," असे म्हटले आहे.

पोस्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, "तिने (दिशा/खुशबू पाटनी) आमचे संत प्रेमानंदजी महाराज व अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केला होता. तिने आपल्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला." या कृत्याला त्यांनी 'ट्रेलर' म्हटले असून, भविष्यात जर पुन्हा असे कृत्य घडले तर "घरातील कोणालाही जिवंत सोडणार नाही," अशी धमकी दिली आहे. हा संदेश फक्त दिशा पाटनीसाठी नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीतील लोकांसाठी असल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता पडताळणी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार: 8-10 गोळ्या झाडल्या, हल्लेखोर परदेशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर करत होते'

शेअर करा