मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dilip Mohite Patil : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दुचाकीस्वारांना कारने धडक दिली, एक तरुण ठार, दुसरा जखमी

Dilip Mohite Patil : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dilip Mohite Patil

Dilip Mohite Patil : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.

पुणे :- पुणे-नाशिक महामार्गावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ओम सुनील भालेराव असे त्याचे नाव आहे. अन्य तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी मंचर पोलिसांनी Pune Manchar Police गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तो दारु पित नाही..; आ.दिलीप मोहिते पाटील

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण देताना त्यांचा पुतण्या मयूर मोहिते अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला नसल्याचा दावा केला आहे. घटनेच्या वेळी आपल्या पुतण्याने कोणत्याही प्रकारचे नशेचे सेवन केले नसल्याचा दावाही आमदाराने केला आहे. Pune Car Accident

पुण्यातील पोर्श दुर्घटनेनंतर पुण्यातून दुसरा अपघात समोर आला आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने त्यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. घटना घडली त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदाराचा पुतण्या दारूच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दारूच्या नशेत त्याने दुचाकीस्वारांना धडक दिली. मयूर मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) यांच्या वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Pune Car Accident

हेही वाचा: Maharashtra Politics : आजपासून संसदेचे पहिले अधिवेशन, इंडिया आघाडीने सरकारला घेरणार, नवनिर्वाचित खासदार घेणार शपथ

शेअर करा