Dharmendra Pradhan : विद्यार्थ्यांच्या आंदोलना पुढे केंद्र सरकारची माघार; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा
dharmendra pradhan : NEET वादानंतर मोठी राजकीय घडामोड
2 मिनिट वाचन

Dharmendra Pradhan : NEET-UG वादाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; रोहित पवारांचा दावा – 'सरकारला झुकवण्यात विद्यार्थ्यांना अखेर यश'
Dharmendra Pradhan : NEET-UG परीक्षेतील कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका गळती आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर देशभरात उभ्या राहिलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर विरोधी पक्षांनी हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा मोठा विजय असल्याचा दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

TET : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंडला बिहारमधून जेरबंद
राजीनामा जाहीर करताना धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासाठी गेली चार दशके काम करण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख केला. देशातील युवकांच्या आकांक्षा, भावना आणि अपेक्षांचा आपण नेहमीच आदर केला असून सक्षम आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था ही मजबूत राष्ट्राचा पाया असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.Dharmendra Pradhan
प्रधान यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आला. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच पुनर्परीक्षेची घोषणा करण्यात आली. पुढील वर्षापासून NEET-UG परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Dharmendra Pradhan

RTE : न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: आरटीई प्रवेशासाठी आईचे जात प्रमाणपत्र ग्राह्य
देशभरातील विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराविरोधात मोर्चे, धरणे, निदर्शने आणि आंदोलन केले होते. अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीच्या घटनाही घडल्या. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस यंत्रणा उभारण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.Dharmendra Pradhan
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचा दावा केला. "१२ वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश आले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे पूर्णपणे देशभरातील विद्यार्थ्यांचे यश आहे. लाठीमार सहन करूनही विद्यार्थ्यांनी 'मिशन रिझाइनेशन' यशस्वी करून दाखवले," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

PMPML: खर्चाचा डोंगर आणि थकबाकीमुळे पुणेकरांची ‘जीवनवाहिनी’ व्हेंटिलेटरवर
रोहित पवार यांनी पुढे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे अभिनंदन केले. सामान्य नागरिकांवर अन्याय झाल्यास कितीही शक्तिशाली सरकार असले तरी लोकशक्तीपुढे झुकावे लागते, हे या आंदोलनाने सिद्ध केल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरविण्याचा तसेच परदेशी शक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. "या राजीनाम्याने अशा सर्व आरोपांना चोख उत्तर मिळाले आहे. आता सरकारला 'मन की बात' नव्हे, तर 'जन की बात' ऐकावीच लागेल," असेही ते म्हणाले .Dharmendra Pradhan
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर आणि परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या या राजकीय घडामोडीकडे देशभराचे लक्ष लागले असून शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत केंद्र सरकार पुढे कोणते निर्णय घेते, याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राजीनाम्याचे संपूर्ण श्रेय विद्यार्थी आंदोलनालाच जाते, हा विरोधकांचा दावा असला तरी त्याबाबत केंद्र सरकारकडून स्वतंत्र अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.Dharmendra Pradhan




