मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dharashive Crime News : धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे ५० किलो गांजा; २१ तोळे सोने जप्त

६९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई https://maharashtramirror.com/

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

धाराशिव येथे ५० किलो गांजा, चरस व २१ तोळे सोने जप्त
६९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई

६९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाईhttps://maharashtramirror.com/

धाराशिव: अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ), छत्रपती संभाजीनगर विभागाने धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश केला आहे. तेरणानगर ढोकी येथील एका दुमजली आलिशान बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ६९ लाख १९ हजार १९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra mirror)

सकाळी ७:२० वाजता टाकली धाड
दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०७:२० वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे एएनटीएफ पथकाने तेरणानगर ढोकी येथील संशयित बाप्पा शंकर पवार याच्या घरावर छापा टाकला. आरोपीच्या उपस्थितीत घराची आणि अंगझडती घेतली असता, घरात ठेवलेल्या गोण्यांमध्ये लपवलेला ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा आणि १३१ ग्रॅम चरस आढळून आला. याव्यतिरिक्त आरोपीकडे २१ तोळे सोन्याचे दागिने आणि मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली. (Maharashtra mirror)

दुसऱ्या मजल्यावर चालत होता जुगार क्लब
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीच्या दुमजली आलिशान बंगल्याच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबवर अवैध रित्या पत्त्यांचा (जुगार) क्लब चालवला जात होता. पोलिसांनी तेथून जुगार खेळण्याचे विविध साहित्य देखील ताब्यात घेतले आहे. (Maharashtra mirror)

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी ढोकी पोलीस ठाणे (जि. धाराशिव) येथे आरोपी बाप्पा शंकर पवार याच्याविरुद्ध एनडीपीएस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा व चरस कुठून आणला गेला आणि तो कोणाकोणाला विकला जाणार होता, या आंतरजिल्हा रॅकेटचा पुढील तपास एएनटीएफ करत आहे. (Maharashtra mirror)


कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई एएनटीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
• मार्गदर्शक अधिकारी: पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक श्री. प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक श्री. अजात टिके, DYSP श्री. साईनाथ ठोंबरे (Maharashtra mirror)https://maharashtramirror.com/

• प्रत्यक्ष कारवाईत सहभागी: पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, स.पो.नि. वाहेद मुल्ला, हनुमान पुरके आणि अंमलदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे, राहुल काळे, अतुल तुपे, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार व आम्रपाली सूर्यवंशी. (Maharashtra mirror)

शेअर करा