मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : पुण्यात महायुतीत 'ठिणगी'! फडणवीसांचा अजितदादांना शेरोशायरीतून इशारा; "हम किसी के बाप से डरते नहीं!"

Devendra Fadnavis : पुण्याच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; "आरशात तोंड बघा" म्हणत फडणवीसांचा टोला

V
Vivek

2 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : पुण्यात महायुतीत 'ठिणगी'! फडणवीसांचा अजितदादांना शेरोशायरीतून इशारा; "हम किसी के बाप से डरते नहीं!"

Devendra Fadnavis : पुण्याच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; "आरशात तोंड बघा" म्हणत फडणवीसांचा टोला

पुणे | पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सत्तेसाठी महायुतीतील मित्रपक्षच आमनेसामने ठाकले आहेत. "70 हजार कोटींचा आरोप असूनही मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे," या अजित पवारांच्या विधानाने आणि भाजपच्या त्रिकुटावर (फडणवीस, मोहोळ, पाटील) केलेल्या टीकेने दुखावलेल्या भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कात्रज येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या टीकेचा समाचार घेताना त्यांना 'आरसा' दाखवला आहे.

"बात निकलेगी तो दूर तलक जाएगी!"

अजित पवारांनी पुण्याच्या संथ विकासकामांवरून भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "निवडणुकीचा रंग भरत असताना जितकी मागे ही चर्चा जाईल, तेवढे 'तुम्ही काय केले' हे लोकांना सांगावे लागेल. उत्तर दिले नाही तर लोक दुर्बल समजतात. पण आमचा फोकस केवळ विकासावर आहे." पुण्यात सध्या 9 हजार कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत त्यांनी दादांच्या आरोपांतील हवा काढून घेतली.

शेरोशायरीतून दिला थेट इशारा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात फिल्मी स्टाईलने शेरोशायरीचा वापर करत अजितदादांना ठणकावले. “शरीफ हैं हम, किसी से लडते नहीं, वरना जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं” असे म्हणत त्यांनी महायुतीत राहून भाजपवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला. "गेल्या पाच वर्षांत आम्ही काय केले, हे विचारण्यापूर्वी तुम्हाला आरशात स्वतःचे तोंड बघावे लागेल," असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या 'त्रिकुटा'चा दादांवर हल्लाबोल केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दादांवर टीकेची झोड उठवली. "दादा अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते, मग तेव्हा शहराचा भरीव विकास का झाला नाही?" असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तर पुणेकर आता विरोधकांना (आणि मित्रपक्षातील विरोधकांनाही) सत्तेपासून दूर ठेवतील, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत रंगत वाढली अजित पवार आणि भाजपमधील या जुंपलेल्या वादामुळे पुण्याचे राजकारण कमालीचे गरम झाले आहे. एका बाजूला महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे जागावाटप आणि श्रेयवादावरून सुरू झालेला हा 'राडा' मतदारांना कोणाकडे झुकवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शेअर करा