मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप; विरोधकांच्या आंदोलनामागे चीनचे कनेक्शन असल्याचा दावा

•ठाण्यातील 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ' यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींवर जोरदार प्रहार; चीनकडून काँग्रेसला निधी मिळत असल्याचा खळबळजनक सवाल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप; विरोधकांच्या आंदोलनामागे चीनचे कनेक्शन असल्याचा दावा

•ठाण्यातील 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ' यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींवर जोरदार प्रहार; चीनकडून काँग्रेसला निधी मिळत असल्याचा खळबळजनक सवाल

ठाणे :- ठाणे येथे आयोजित 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ' यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. विरोधक मोर्चे काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने निर्माण केलेल्या मुख्य लोकशाही संस्थांना पद्धतशीरपणे बदनाम करत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी देखील देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार संपवण्यासाठी आणि देशात अराजकता निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उतरले असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

"चीनच्या पैशांवर भारतात अराजकता पसरवण्याचा डाव"

सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राहुल गांधींना लक्ष्य करत गंभीर प्रश्न उपस्थित केला. भारताला सतत पाण्यात पाहणारा आणि सीमेवर घुसखोरीसाठी आतुर असणारा देश चीन आहे, मग अशा वेळी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या ट्रस्टला चीनकडून मोठ्या प्रमाणावर डोनेशन (निधी) का मिळत आहे, असा थेट सवाल त्यांनी केला. राहुल गांधी चीनकडून मिळालेल्या पैशाच्या बळावर भारतात अराजकता पसरवण्याचे षडयंत्र रचत असून, त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या हेतूवरही मुख्यमंत्र्यांनी संशय व्यक्त केला.

संस्थांना बदनाम करण्याचे आणि संविधान बदलाचे षडयंत्र

मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, विरोधकांच्या हातात असलेले लाल संविधान हे केवळ एक 'मास्क' म्हणजेच मुखवटा आहे. या लाल पुस्तकाचा वापर करून नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशप्रमाणेच भारतातील संविधान व व्यवस्था बदलण्याचा डाव आखला जात आहे. थेट संविधानाला विरोध केला तर जनता स्वीकारणार नाही, म्हणूनच संविधानाने स्थापन केलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोग, आरबीआय (RBI), कॅग (CAG) आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थांना बदनाम करून देशात अराजकता माजवली जात आहे.

शेअर करा