मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

डिलिव्हरी बॉयकडून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

•36 तासात आरोपीला अटक, मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

डिलिव्हरी बॉयकडून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

•36 तासात आरोपीला अटक, मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिरा रोड :- मिरा रोड पोलिस ठाण्याचे हद्दीत मिरा रोड येथे रहाणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलाला "भाईंदर किधर है" असे विचारून एका डिलिव्हरी बाॅयने स्कुटीवर बसून घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर एका नवीन इमारतीमध्ये घेऊन तिथे तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अवघ्या 36 तासात आरोपीला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचे विनयभंगाचा असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी नमूद गुन्हयातील आरोपीचा तात्काळ शोध घेवून अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपी याचा गुन्हयाचे घटनास्थळावरून कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत होता. पोलिसांनी आरोपी अजय धर्मा गुप्ता, (वय 23 , व्यवसाय स्विगी डिलीव्हरी, रा. युथ व्हॅली गेस्ट हाऊस, दिपक हॉस्पिटलचे पाठीमागे, क्वोन्स पार्क, मिरारोड पू, मुळ रा.ता. फतेहबाद, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश) याला गुन्हयात अटक करण्यात आलो आहे.गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले हे करत आहे.

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ01, मिरारोड, डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, मेघना बुरांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरारोड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले, संतोष सांगवीकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार सेदीप गिरमे, हनुमंत तेरवे, बालाजी हरणे, प्रकाश पवार, पोलीस शिपाई शंकर शेळके, अथर्व देवरे व चंद्रदीप दासरे अधिकारी/अंमलदार यांनी केली आहे.

हेही वाचा: Thane Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 09 गुन्हयांची उकल

शेअर करा