मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Deepak Deshmukh : परळीत मुंडे बंधूंना मोठा धक्का! माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख 'शरद पवार' गटात

•'विकास कामातील भ्रष्टाचारामुळे' राष्ट्रवादीत प्रवेश; धनंजय मुंडेंवर बोगस मतदान आणि फाइल्स गायब केल्याचा गंभीर आरोप; पत्नी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Deepak Deshmukh : परळीत मुंडे बंधूंना मोठा धक्का! माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख 'शरद पवार' गटात

•'विकास कामातील भ्रष्टाचारामुळे' राष्ट्रवादीत प्रवेश; धनंजय मुंडेंवर बोगस मतदान आणि फाइल्स गायब केल्याचा गंभीर आरोप; पत्नी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात

मुंबई :- परळीचे राजकारण पुन्हा एकदा हादरले आहे. परळी नगरपरिषदेतील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) मध्ये प्रवेश केला आहे. दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवार असतील. देशमुख यांचा हा प्रवेश आणि त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेले थेट आरोप, यामुळे मुंडे कुटुंबाच्या राजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे.

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

पक्षाच्या प्रवेशानंतर बोलताना दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, परळीत सगळे आम्हाला 'अर्धवटराव' म्हणतात, कारण नगराध्यक्ष म्हणून आम्हाला धनंजय मुंडे यांनी काम करू दिले नाही. आता कामे पूर्ण करण्यासाठीच आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलो असून अर्धवट कामे पूर्ण करायची आहेत. त्यांनी नगरपरिषदेतील करोडो रुपयांच्या टेंडरच्या सगळ्या फाइल्स गायब असल्याचा आरोप केला, ज्यामुळे हजारो कोटींची कामे अर्धवट आहेत. सर्वात गंभीर म्हणजे, धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आले असून, मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातील सीसीटीव्ही काढून बोगस मतदान केले, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

राजकीय भूमिका आणि पत्नीची उमेदवारी

"मी व्यक्तीनिष्ठ माणूस आहे, पक्षनिष्ठ नाही," असे स्पष्ट करत देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे तर विधानसभेत धनंजय मुंडे यांचे काम केल्याचे नमूद केले. आता नगराध्यक्षपदाची जागा महिलांसाठी राखीव असल्याने, त्यांनी आपली पत्नी संध्या देशमुख यांच्या प्रचाराला दीड महिन्यापासून सुरुवात केली असून, परळीतील जनता आपल्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी पक्षप्रवेश केला. परळीच्या आगामी राजकारणात या प्रवेशाचे आणि गंभीर आरोपांचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Aaditya Thackeray : 'मातोश्री' परिसरात ड्रोन फिरल्याने खळबळ! आदित्य ठाकरेंचा संताप; पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप

शेअर करा