मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह सापडला, दोघांना अटक

•Dead body found in a bag at Dadar railway station दादर रेल्वे स्थानकावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dadar Railway Station

•Dead body found in a bag at Dadar railway station दादर रेल्वे स्थानकावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरपीएफने रेल्वे स्थानकातून एका बॅगेत मृतदेह, घेऊन जाणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे

मुंबई :- मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर Dadar Railway Station एका बॅगेत मृतदेह आढळून आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेह ट्रेनमध्ये सुटकेसमध्ये घेऊन जाणाऱ्या दोन संशयितांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) सामानाची तपासणी करत असताना त्यांना सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला. चौकशी केली असता हा खून पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपीमध्ये महिला मैत्रिणीवरून वाद झाला होता. जय प्रवीण चावडा आणि त्याचा सहकारी शिवजित सुरेंद्र सिंग अशी संशयितांची नावे आहेत. Dadar Railway Station सांताक्रूझ येथील रहिवासी अर्शद अली शेख याच्या हत्येत दोघांचा सहभाग होता. पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांनी रविवारी रात्री तुतारी एक्स्प्रेस ट्रेनने जाण्याचा बेत आखला होता. दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: Maharashtra Politics : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास वाव्हळ- आळेकर इच्छुक…. तेली समाजाचा मोठा चेहरा

शेअर करा