मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

15 ऑगस्टला मांसबंदीवरून राज्यात वादंग; फडणवीस- पवार आमनेसामने

• मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा – "1988 चा जुना निर्णय, आमच्या सरकारचा संबंध नाही"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis

•मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा – "1988 चा जुना निर्णय, आमच्या सरकारचा संबंध नाही"

मुंबई :- राज्यातील अनेक महापालिकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "हा निर्णय राज्य सरकारचा नसून 1988 मध्ये तत्कालीन सरकारने घेतलेला आहे. त्यावेळीच संबंधित शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला होता. महापालिका दरवर्षी याच जीआरच्या आधारे निर्णय घेतात. मला माध्यमांतूनच याची माहिती मिळाली." त्यांनी पुढे सांगितले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही काही महापालिकांनी असा निर्णय घेतला होता. सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्याची इच्छा नाही. आहार हा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यावर राजकारण करणं चुकीचं आहे."

फडणवीसांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की, "काही जण तर शाकाहारी लोकांना नपुंसक म्हणतात, हे अतिरेकी वक्तव्य थांबले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या पसंतीनुसार जेवणाचा अधिकार आहे."

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांसबंदीविरोधात भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की, "श्रद्धेच्या निमित्ताने काही दिवस मांसबंदी केली जाते, जसे आषाढी एकादशी, महाशिवरात्र किंवा महावीर जयंती. पण स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असून तो आहारावर बंधन घालण्याचा दिवस नाही. कोकणात बोंबील, सुकट यांसारखा मासे आहाराचा भाग आहे. मग एखाद्याच्या आहारावर बंदी घालणे योग्य कसे?"

पवारांनी पुढे इशारा दिला की, "जर स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन किंवा 26 जानेवारीला अशी बंदी घालायला लागली तर परिस्थिती अवघड होईल. महत्त्वाच्या शहरांमध्ये विविध जाती-धर्माचे लोक राहतात. भावनिक मुद्दे असतील तर निर्णय लोक मान्य करतात, पण आहारावर एकतर्फी बंधन हा योग्य मार्ग नाही."

हेही वाचा: Dadar Kabutar khana News : दादर कबुतरखाना प्रकरण तापले; मराठी एकीकरण समितीचे आंदोलन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

शेअर करा