मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

’अल निनो’शी मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला कडक निर्देश

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

’अल निनो’शी मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला कडक निर्देश

ज्या भागात भूजल पातळी खालावली आहे, तिथे कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन पाणी साठवण क्षमता वाढवण्याच्या सूचना

  • ’जलयुक्त शिवार २.०’ च्या कामांना गती द्या
  • १५ मे पर्यंत आराखड्यांना मंजुरीचे आदेश
  • विदर्भातील मालगुजारी तलावांची दुरुस्ती जूनपर्यंत पूर्ण होणार
  • मुंबई: राज्यात 'अल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे संकट ओढवू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत असलेली जलसंधारणाची कामे आणि पाणी साठवणुकीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. “ज्या भागात भूजल पातळी खालावली आहे, तिथे कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन पाणी साठवण क्षमता वाढवा,” असे निर्देश त्यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

    ’वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक
    मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती आणि जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

    १५ मे ची डेडलाईन आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश
    ’अल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृद व जलसंधारण विभागाला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, जलयुक्त शिवार अभियान २.० चे राज्यस्तरीय आराखडे १५ मे पूर्वी मंजूर करून पावसाळ्यापूर्वी कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये समाविष्ट गावांतील दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देतानाच, विदर्भातील ऐतिहासिक मालगुजारी तलावांची दुरुस्ती जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करणे, नाल्यांमधील गाळ उपसल्यानंतर तिथे मातीची धूप रोखण्यासाठी बांबू लागवडीचे नियोजन करणे आणि केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ योजनेचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

    शेअर करा