मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CM Devendra Fadnavis : "बाप कोण?" वाद पेटला; फडणवीसांची राणेंना समज

Devendra Fadnavis On Nitesh Rane : नीतेश राणेंच्या वादग्रस्त विधानावरून मुख्यमंत्री नाराज?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis On Nitesh Rane : नीतेश राणेंच्या वादग्रस्त विधानावरून मुख्यमंत्री नाराज?

मुंबई : "कोणी कितीही नाचले तरी 'बाप' भाजपचा मुख्यमंत्रीच आहे," या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. युतीतील शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी या विधानाचा तीव्र निषेध करत थेट राज्य मंत्रिमंडळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

मंत्रिमंडळात शिवसेना मंत्र्यांचा फडणवीसांना थेट सवाल

"आमचा बाप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?" असा रोखठोक सवाल शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांना विचारला. त्यावर फडणवीस यांनी “’बाप’ असा उल्लेख अयोग्य आहे” असे सांगत राणेंना समज दिल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावरून युतीत सुरू असलेला संघर्ष अधिक उफाळून आला आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी समितीच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्यावर नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांना लक्ष्य करत 'बाप भाजपचा मुख्यमंत्रीच आहे' असा टोला लगावला होता.

राणे यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचा खुलासा केला असला, तरी फडणवीस यांनी त्यांना "राजकारणात शब्दांच्या अर्थाची व्याप्ती समजून जपून बोलावं लागतं," अशा शब्दांत सजगतेचा सल्ला दिल्याचे समजते.

शेअर करा