मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना दिला आणखी एक झटका, अजय आशर यांची मित्र संस्थेतून हकालपट्टी

CM Devendra Fadnavis On Eknath Shinde : सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना दिला आणखी एक झटका, अजय आशर यांची मित्र संस्थेतून हकालपट्टी

CM Devendra Fadnavis On Eknath Shinde : सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेले निर्णय.

मुंबई :- सरकारने NITI आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र माहिती आणि परिवर्तन (मित्र) संस्थेची स्थापना केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी या संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय आशर Builder Ajay Ashar यांची नियुक्ती केली होती.मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मोठा निर्णय घेत अजय आशर यांना मित्राच्या नियमित मंडळातून हटवले आहे.

अजय आशर हे ठाण्यातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक असून किसननगर परिसरातील अनेक बांधकाम प्रकल्पांशी त्यांचा संबंध आहे. हा परिसर एकनाथ शिंदे यांच्या प्रभावशाली विधानसभा मतदारसंघात येतो. आशर हे यापूर्वी काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजय आशर यांची जवळीक वाढली, त्यामुळे आशर यांना ठाण्यातील पुनर्विकास प्रकल्पांना प्राधान्य मिळू लागले.

आशर यांच्या जागी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

शेअर करा