मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : शिवाजी पार्कवर गांधीगिरी

Mumbai News : *मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही हजारो तरुणांनी शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ बाहेर ठिय्या मांडला *‘ज्ञानू, इट्स डन ब्रो!’ आणि ‘गो ज्ञानू गो!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला *तुषार गांधी, नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, इम्रान खान, विशाल ददलानी आणि विशाल भारद्वाज यांची उपस्थिती *स

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

शिवाजी पार्कवर गांधीगिरी
शिवाजी पार्कवर गांधीगिरी

Mumbai News : विविध संघटनांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हजारो तरुण-तरुणींचे गांधी जयंती दिवशी मुंबईसह देशातील विविध शहरांत मोठे आंदोलन

Mumbai News :*मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही हजारो तरुणांनी शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ बाहेर ठिय्या मांडला
*‘ज्ञानू, इट्स डन ब्रो!’ आणि ‘गो ज्ञानू गो!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला
*तुषार गांधी, नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, इम्रान खान, विशाल ददलानी आणि विशाल भारद्वाज यांची उपस्थिती
*सीजेपीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर आणि ५०० आंदोलकांवर विविध कलमांन्वये तसेच दिल्लीतही गुन्हे दाखल
*अभिजीत दिपके यांचे मोदी, शहा आणि फडणवीसांना आव्हान

Mumbai News :मुंबई: गांधी जयंती (२ ऑक्टोबर) रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) आणि विविध संघटनांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विशाल एल्गार पुकारण्यात आला. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही हजारो तरुणांनी शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ बाहेर ठिय्या मांडला. ‘ज्ञानू, इट्स डन ब्रो!’ आणि ‘गो ज्ञानू गो!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात अभिनेते नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, इम्रान खान, संगीतकार विशाल ददलानी, विशाल भारद्वाज आणि तुषार गांधी आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरम्यान, शनिवारी (३ ऑक्टोबर) पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, साम्या कोरडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर आणि सुमारे ५०० आंदोलकांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही जंतरमंतर येथे जमा झालेल्या तरुणांवर तीन गुन्हे नोंदविण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अभिजीत दिपके यांची मोदी, शहा आणि फडणवीसांवर टीका


अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी अमित शहा यांना आव्हान देत म्हटले की, “दिल्लीतील जंतर-मंतरवर लाठीचार्ज करण्याची दुसरी चूक करू नका, अन्यथा तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल. गुंडगिरी करायची असेल तर गृहमंत्री बनू नका, गुंड बना.”

फडणवीसांच्या इशाऱ्याला उत्तर देताना दिपके म्हणाले, “आम्ही तीन दिवस काय, तीन महिने तुरुंगात जायला तयार आहोत, पण राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही.” त्यांनी असा आरोप केला की, गेल्या दोन वर्षांत देशभरात १३ कोटी मते कापली गेली आणि महाराष्ट्रात ४० लाख मते वाढवली गेली.

दिपके यांनी महात्मा गांधींना भारताचा आत्मा, डॉ. आंबेडकरांना पाठीचा कणा आणि नेहरूंना मेंदू संबोधले. पंतप्रधान मोदींच्या फॅशन सेन्सवर टिप्पणी करत त्यांनी, “जनतेला फक्त रांगेत उभे करण्याचे काम सरकारने केले आहे,” असा आरोप केला.

निधी आणि शूजविषयी वक्तव्य
आंदोलनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत निधीवरून विचारलेल्या प्रश्नावर आक्रमक होत दिपके म्हणाले, “मी ३० हजार रुपयांचे शूज घालतो आणि हे सांगताना मला कोणतीही लाज वाटत नाही. आमच्या फंडिंगचा आणि निवडणूक आयोगातील गैरव्यवहाराचा काय संबंध?”

सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया
राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सीजेपी आणि अभिजीत दिपके यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले.

राणे म्हणाले की, शिवाजी पार्कवरील आंदोलन हे दिल्लीतील देशविरोधी आंदोलनाचाच ‘भाग-२’ आहे. आंदोलनाच्या आडून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा अवमान करणारा अजेंडा चालवला जात आहे.

हिंदुत्वाचा दावा करणारे ठाकरे बंधू अशा देशविरोधी आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या घटकांना पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत दिपके यांनी जाहीर माफी मागावी आणि पोलिसांनी त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.

जंतरमंतरवर आंदोलन सुरूच
मुंबईतील आंदोलनासोबतच दिल्लीतील जंतर-मंतरवर ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
२ ऑक्टोबर रोजी दिल्लीत आप, एआयएसए, एसएफआय, एनएसयूआय आणि काँग्रेसच्या युवा आघाडीने काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी सुमारे १,००० आंदोलकांना ताब्यात घेतले. यात आतिशी, योगेंद्र यादव आणि नेहा बोरा यांचा समावेश होता. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये ३ एफआयआर दाखल केले आहेत.

नेहा बोरा आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जंतरमंतर येथे पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

१० ऑक्टोबरच्या मोठ्या आंदोलनाची घोषणा
अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर १० ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील नागरिक व तरुण दिल्लीतील जंतरमंतरवर धडक देऊन शांततापूर्ण मार्गाने भव्य आंदोलन करतील. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनकर्त्या तरुणांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा