मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chhatrapati Shivaji Maharaj : पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chhatrapati shivaji maharaj: The grand monument of Chhatrapati Shivaji Maharaj at Panhala Fort; Deputy Chief Minister Eknath Shinde's announcement

Eknath Shinde : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. कोल्हापूरचे आमदार आणि लाखो शिवभक्तांची अनेक दिवसांपासून मागणी होती.

मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Chhatrapati Shivaji Maharaj बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि लाखो शिवप्रेमींच्या वर्षानुवर्षे मागणी मंजूर करण्यात आल्या. वास्तविक, पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकासाठी उपमुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.या संदर्भातील शासन निर्णय तातडीने जारी करून संबंधित आमदारांना सुपूर्द करण्यात आला.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पन्हाळा किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे.या किल्ल्यात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य 133 दिवस होते.

कोल्हापूरच्या आमदारांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्याचे बलिदान, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्य या सर्व ऐतिहासिक घटनांमुळे हा किल्ला महत्त्वाचा आहे.

मात्र असे असतानाही या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नसल्यामुळे या ठिकाणी शिवस्मारक उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. यापूर्वी ही मागणी प्रथमच उचलून धरली असता तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.मात्र शिवस्मारकाच्या उभारणीचे काम काही कारणांमुळे रखडले होते.

शेअर करा