मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chakan Police News : 'भाई'गिरीची मस्ती जिरली! चाकण पोलिसांनी सराईत गुन्हेगाराची भर बाजारपेठेत काढली धिंड

Chakan Police Latest News : कोयत्याने हल्ला करणाऱ्या रजित येरकरला रस्त्यावर उठाबशा करण्याची शिक्षा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chakan Police News : 'भाई'गिरीची मस्ती जिरली! चाकण पोलिसांनी सराईत गुन्हेगाराची भर बाजारपेठेत काढली धिंड

Chakan Police Latest News : कोयत्याने हल्ला करणाऱ्या रजित येरकरला रस्त्यावर उठाबशा करण्याची शिक्षा

चिंचवड :- पिंपरी-चिंचवडच्या चाकण पोलिसांनी Chakan Police Staion परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि स्वतःला 'भाई' समजणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराची चक्क बाजारपेठेतून धिंड काढून त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. रजित येरकर (वय अंदाजे 28) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. PCMC Latest News

नेमके काय घडले?

रजित येरकर आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी रिक्षा चालकाला कट मारल्याच्या किरकोळ वादातून कोयत्याने आणि लाठ्या-काठ्यांनी रिक्षा चालक व त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केला होता. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी रिक्षा चालकाला मोबाईलमध्ये फोटो काढून धमकावले होते. या प्रकरणी चाकण पोलिसांनी तातडीने रजित येरकर आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. Pune Police News

भर चौकात 'उठाबशा'

चाकण पोलिसांनी या गुन्हेगाराची 'भाई'गिरीची मुजोरी मोडून काढण्यासाठी अनोखी पद्धत वापरली. आरोपी रजित येरकरच्या हाताला आणि दंडाला दोरखंड बांधून त्याची चाकणच्या बाजारपेठेतून धिंड काढण्यात आली. इतकेच नव्हे, तर भर चौकात नागरिकांच्या समोर पोलिसांनी त्याला उठाबशा करायला लावल्या. Pune Chakan Police Latest News

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे आणि 'भाई'गिरी मोडून काढल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.

शेअर करा