मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

परीक्षा पेपर युट्युबवर प्रसारित केल्याने गुन्हा दाखल

•'कैलासन सर मॅथ्स', 'म मराठी', 'एस.जे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

परीक्षा पेपर युट्युबवर प्रसारित केल्याने गुन्हा दाखल

•'कैलासन सर मॅथ्स', 'म मराठी', 'एस.जे. ट्युशन क्लासेस' या चॅनेलवर पेपर फुटल्याचा आरोप

पुणे :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 3 री ते 9 वीच्या परीक्षांचे पेपर आणि त्यांची उत्तरे परवानगीशिवाय युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिषदेच्या सहायक संचालक संगीता शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, 'कैलासन सर मॅथ्स', 'म मराठी' आणि 'एस.जे. ट्युशन क्लासेस' या तीन खासगी युट्युब चॅनेलवर हे पेपर प्रसारित करण्यात आले. यावर्षी 6 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत पायाभूत चाचणी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी परिषदेने 17 ते 31 जुलै दरम्यान कार्गो कंपनीमार्फत शाळांमध्ये पेपर पाठवले होते.

6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता काही युट्युब चॅनेलवर सातवीच्या मराठी विषयाचा पेपर, तसेच 5 आणि 7 ऑगस्टला होणाऱ्या सातवी आणि आठवीच्या गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे समोर आले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या आणि इतर परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याच्या कायद्यानुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता या युट्युब चॅनेलच्या मालकांवर कारवाईची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: Pune Crime News : पुणे जिल्ह्यात 19 लाखांची गावठी दारू जप्त

शेअर करा