मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

Pune News पुणे : बोपोडी परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी आणि बोपोडीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बोपोडी येथील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर
बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

Pune News पुणे : बोपोडी परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी आणि बोपोडीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बोपोडी येथील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुण्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर हे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी मा. सतीश कुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), मा. अर्चना पाटील, उपजिल्हाधिकारी तसेच मा. ऋषिकेश घाटे, सहाय्यक अधिकारी यांच्यासमवेत बोपोडी परिसरातील सर्व्हे नं. २३ व २४, नाईक चाळ, भोईटे चाळ, इंदिरा वसाहत, आदर्श नगर तसेच सर्व्हे नं. ५३ व ५४, बोपोडी, मुंबई-पुणे रोड या भागांची पाहणी केली. https://maharashtramirror.com/ Pune News
यावेळी बोलताना मा. परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, बोपोडी परिसरातील सुमारे ७० टक्के भाग झोपडपट्टी क्षेत्रात येतो. या परिसरातील रेडीरेकनरचा दर तुलनेने कमी असल्यामुळे विकासकांना येथे SRA योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यास अपेक्षित आर्थिक व्यवहार्यता मिळत नाही. परिणामी अनेक विकासक बोपोडी परिसरात SRA योजना राबविण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बोपोडी परिसरातील नागरिकांना चांगली घरे, मूलभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्यासाठी रेडीरेकनरच्या दरात योग्य ती वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. रेडीरेकनरचा दर वाढल्यास SRA प्रकल्पांसाठी विकासकांना प्रोत्साहन मिळेल आणि रखडलेल्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल. https://maharashtramirror.com/ Pune News
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी बोपोडीतील रेडीरेकनरचा दर वाढविणे हा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो, असेही मा. वाडेकर यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोपोडी परिसरातील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी ठोसपणे मांडण्यात येणार असल्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी स्पष्ट केले.

शेअर करा