मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bombay High Court Bomb threat : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपासणी मोहीम

गेल्या आठवड्यातही दिल्ली-मुंबई उच्च न्यायालयाला एकाच दिवशी मिळाली होती धमकी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bombay High Court Bomb threat : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपासणी मोहीम

  • गेल्या आठवड्यातही दिल्ली-मुंबई उच्च न्यायालयाला एकाच दिवशी मिळाली होती धमकी
  • मुंबई :- हुतात्मा चौकातील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल शुक्रवारी पुन्हा एकदा प्राप्त झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली, मात्र त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. यामुळे उच्च न्यायालयातील कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.

    यापूर्वी गेल्या आठवड्यातही दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाला एकाच दिवशी बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाले होते. त्या वेळी संपूर्ण न्यायालय रिकामे करून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा धमकीचा ई-मेल आल्यामुळे मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

    शुक्रवारी पहाटे हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. तातडीने सकाळीच पोलीस पथकाने न्यायालयाच्या इमारतीची कसून तपासणी केली, पण त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. या दोन्ही धमकीच्या प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, आरोपीने ‘डार्क नेट’ आणि ‘व्हीपीएन’ (VPN) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत.

    हेही वाचा: Pune News : पडळकरांच्या विरोधात पुण्यात फलकबाजी; ‘सडकछाप नेता’, ‘संस्कार करायला बाप कमी पडला’ असे फलक चर्चेत

    शेअर करा