मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bomb Threat in Mumbai : राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बची धमकी; निनावी ईमेलने खळबळ

Bomb Threat in Mumbai: सुरक्षेच्या कारणास्तव शाळा रिकामी; विद्यार्थी घरी पाठवले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bomb Threat in Mumbai

Bomb Threat in Mumbai:  सुरक्षेच्या कारणास्तव शाळा रिकामी; विद्यार्थी घरी पाठवले

नालासोपारा | नालासोपारा पश्चिमेतील श्रीप्रस्थ येथील राहुल इंटरनॅशनल शाळेला बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शाळेत बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. Bomb Threat in Mumbai या मेलमध्ये शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

सदर ईमेल शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या मेल आयडीवर आल्याने तातडीने नालासोपारा पोलीस ठाण्यास तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. या घटनेनंतर तात्काळ शाळा रिकामी करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

घटनेची गंभीरता लक्षात घेता, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, क्राईम ब्रँच युनिट-3, खंडणी विरोधी पथक, सायबर क्राईम युनिट, तसेच वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) यांना पाचारण करून संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली. प्राथमिक तपासात काहीही सापडले नसले तरी, पोलीस अधिक चौकशी करत असून, ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सायबर पथक करीत आहे.परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले की, "ही घटना गंभीर असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत."

यापूर्वीही पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मिरा रोड येथील शाळा अशा निनावी ईमेलमुळे गोंधळात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

शेअर करा