मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhosari Water Tank Accident | भोसरीत पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

रेस्क्यू ऑपरेशन सुरु अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल

M
mubarak

1 मिनिट वाचन

bhosari water tank accident

  • रेस्क्यू ऑपरेशन सुरु
  • अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल
  • पुणे, दि. २४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी

    Bhosari Water Tank Accident | भोसरीत पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यूभोसरीतील सद्गुरू नगर येथे भीषण घटना घडली आहे. बांधकाम प्रक्लसाठी तकलादू पद्धतीने उभारण्यात आलेली पाण्याची टाकी कामगारांवर कोसळल्याने ५ कामगारांचा दुर्दैवी मुर्त्यू झाला आहे. बचाव कार्य करण्यासाठी रेस्क्यू ऑपेरेशन सुरु करण्यात आला असून अग्निशमन दल व पोलीस यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. Bhosari Water Tank Accident |

    मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली एक पाण्याची टाकी कोसळली. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी साधारण ७ च्या दरम्यान ही पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडली.

    अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
    या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

    हेही वाचा: Pune Bribe News : महावितरणाच्या लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीचा "झटका", दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

    शेअर करा