मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane News : 'भिवंडीत राज्य उत्पादन शुल्काचा धडाकेबाज छापा; तब्बल 23 लाखांचा बनावट विदेशी दारूचा साठा अन् 72 हजार बुचे जप्त!'

Thane News : विशेष बातमीदार (महाराष्ट्र मिरर), ठाणे/भिवंडी : - अवैध, बनावट आणि परराज्यातील मद्याच्या विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम उघडली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

'भिवंडीत राज्य उत्पादन शुल्काचा धडाकेबाज छापा; तब्बल 23 लाखांचा बनावट विदेशी दारूचा साठा अन् 72 हजार बुचे जप्त!'
'भिवंडीत राज्य उत्पादन शुल्काचा धडाकेबाज छापा; तब्बल 23 लाखांचा बनावट विदेशी दारूचा साठा अन् 72 हजार बुचे जप्त!'

Thane News : 'लोनाड गावातील शेडमधून 'इम्पिरिअल व्हिस्की'चे 102 बॉक्स हस्तगत; एका आरोपीला बेड्या, दुसरा फरार!'

Thane News : विशेष बातमीदार (महाराष्ट्र मिरर), ठाणे/भिवंडी :- अवैध, बनावट आणि परराज्यातील मद्याच्या विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम उघडली आहे. कोकण विभागाच्या भरारी पथकाने भिवंडी तालुक्यातील लोनाड गावात दोन ठिकाणी गुप्त छापे टाकून बनावट विदेशी दारूचा मोठा साठा आणि दारूच्या बाटल्यांची 72 हजार बनावट बुचे जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी 22 लाख 98 हजार 680 रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या थेट आदेशानुसार ही धडक कारवाई पार पडली.https://maharashtramirror.com/ Thane News

'शिवनगर अन् जरीमरी मंदिरा जवळ छापे; 72 हजार बनावट बुचे जप्त'

भिवंडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट व अवैध मद्याचा साठा उपलब्ध असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक ठाणेचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने 5 ऑक्टोबर 2026 रोजी लोनाड गावातील चौधरीपाडा, शिवनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये आणि राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली.https://maharashtramirror.com/ Thane News

तेथून विविध नामांकित ब्रँड्सच्या विदेशी दारूच्या बाटल्यांना लावली जाणारी बनावट प्लास्टिकची व पत्र्याची 72 हजार बुचे जप्त करण्यात आली. या ठिकाणी मिळालेला आरोपी रमेश काळुराम जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली.

'102 बॉक्स बनावट व्हिस्की हस्तगत; एकाला अटक तर दुसरा फरार'

आरोपी रमेश जाधव याने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने लागलीच लोनाड गावातील जरीमरी मंदिराजवळ असलेल्या 'थळे चाळ' येथे दुसरा छापा टाकला. या ठिकाणाहून 'इम्पिरिअल ब्लू व्हिस्की' या ब्रँडच्या 750 मिली क्षमतेच्या बाटल्यांचे 102 बॉक्स जप्त करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 22 लाख 98 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी रमेश काळुराम जाधव याला अटक केली आहे, तर त्याचा साथीदार आरोपी सोमनाथ जाधव हा फरार झाला असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'विभागीय भरारी पथकाची यशस्वी कामगिरी'

ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव, रिंकेश दांगट, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम. पी. कोळेकर, तसेच जवान हनुमंत गाढवे, अमित सानप, कुणाल तडवी आणि वाहनचालक विजय उतेकर यांनी पार पाडली.या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क भिवंडी विभागाच्या निरीक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष मदत केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास निरीक्षक दिगंबर शेवाळे करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा