मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Loksabha Election Result : केंद्रीय मंत्री पराभूत, शरद पवार गटाचे नेते भिवंडीतून विजयी

•लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Loksabha Election Result : केंद्रीय मंत्री पराभूत, शरद पवार गटाचे नेते भिवंडीतून विजयी

•लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यात 48 जागा आहेत. महत्त्वाची लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आहे.

लोकसभा निवडणुक निकाल लाईव्ह :- केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या पक्षाचे सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा विजयी झाले आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल प्रकाश बाबू पाटील आघाडीवर आहेत. तर भाजपचे संजय काका पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दक्षिण मध्य : अरविंद सावंत यांची विजयाकडे वाटचाल दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारांमध्ये लढत होत आहे. शिंदेंच्या शिवसेनेने आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचा विजय झालेला असल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भातील घोषणा अद्याप झालेली नाही. यामध्ये विशेष बाब म्हणजे अरविंद सावंत 55185 मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांना 228410 मते पडली आहेत. तर यामिनी जाधव यांना 1,73,225 मते पडली आहेत.

शेअर करा