मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Fire News : भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल.

•Bhiwandi Walshind V - Logis Fire भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Fire News : भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल.

•Bhiwandi Walshind V - Logis Fire भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीच्या घटनेत सर्व सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

भिवंडी :- भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावात व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात शर्तीचे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.ही भीषण आगीची घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळ घडली. या आगीच्या घटनेत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक Bhiwandi Fire News गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीमुळे गोदामात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाल्याची माहिती आहे. यामुळे किती प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्याची अद्यावत माहिती समोर आली नाही.

हेही वाचा: Harshvardhan Patil Joins Sharad Pawar Gat : भाजपला झटका, हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!

शेअर करा