मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Crime News : भिवंडीत 'दारूची नदी' आटवली! - 1,115 लिटर हातभट्टी दारूचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

• ​गोपनीय माहितीवर आधारित छापा; आलिमघर येथील घरातून 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत; एका आरोपीला बेड्या

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Crime News : भिवंडीत 'दारूची नदी' आटवली! - 1,115 लिटर हातभट्टी दारूचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

• ​गोपनीय माहितीवर आधारित छापा; आलिमघर येथील घरातून 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत; एका आरोपीला बेड्या

भिवंडी (नारपोली) :- भिवंडी परिसरात अवैध गावठी दारूची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून तब्बल 1,115 लिटर तयार हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

दिनांक 4 डिसेंबर रोजी पोलीस हवालदार किशोर थोरात यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने आलिमघर, भिवंडी येथील आरोपी रुपेश नारायण पाटील (वय 35) याच्या राहत्या घराशेजारील खोलीमध्ये छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 11 हजार 500 रुपये किंमतीची 1,115 लिटर हातभट्टीची तयार दारू असा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी आरोपी रुपेश पाटील याच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: Pune News : शाळा दूर, बालविवाह जवळ! - राज्यातील 15 हजार किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित; शिक्षण विभागाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह

शेअर करा