मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : 'ॐ फट स्वाहा!’ – विरोधकांची गोगावले यांच्यावर विधानभवनात मंतरलेली टीका

•ठाकरे गटाचा विधानभवनाच्या पायऱ्यांवर 'अघोरी' अंदाज, गोगावले यांची खिल्ली उडवली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : 'ॐ फट स्वाहा!’ – विरोधकांची गोगावले यांच्यावर विधानभवनात मंतरलेली टीका

•ठाकरे गटाचा विधानभवनाच्या पायऱ्यांवर 'अघोरी' अंदाज, गोगावले यांची खिल्ली उडवली

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या टीकास्त्रांमध्ये आता मंत्र-मंत्रयंत्रांचाही शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असलेल्या विरोधकांनी आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर उपरोधिक शैलीत निशाणा साधला.

भरत गोगावले विधानभवनात जात असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘ॐ फट स्वाहा!’ अशी घोषणा देत, त्यांच्यावर टोला लगावला. त्याचवेळी आमदार आदित्य ठाकरे यांनीही गोगावले यांची नकळत नक्कल करत वातावरण अधिक गुदगुलीत केले.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

मात्र, यामागे एक गंभीर पार्श्वभूमाही आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्यावर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ‘अघोरी पूजा’ केल्याचा थेट आरोप केला होता. “गोगावले यांनी उज्जैनच्या बागलामुखी मंदिरात ११ पुजाऱ्यांसोबत पूजा करून नंतर स्वतःच्या घरी विशेष पूजा घातली,” असा गंभीर आरोप मोरे यांनी केला.

“15 लाख रुपये खर्चून एका पूजेसाठी मांत्रिक बाहेर राज्यातून बोलावले गेले. ‘ॐ फट स्वाहा’ उच्चारणाऱ्या मांत्रिकांचा ससेमिरा महाराष्ट्रातील नेत्यांमागे लागलेला दिसतो,” असा गौप्यस्फोट करत मोरे यांनी भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला.

अनिल परब यांनीही रायगडमध्ये सुरु असलेल्या 'अघोरी’ कृतींवरून गोगावले यांच्यावर टीकास्त्र सोडले. “इतकंच काय, त्यांनी लाडक्या बहीणींच्या सुरक्षेसाठी ‘लिंबू-मिरची’ पर्यंत विधानभवनात आणली होती,” असा उपरोधिक टोमणाही परब यांनी लगावला.

हेही वाचा: Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : 'ॐ फट स्वाहा!’ – विरोधकांची गोगावले यांच्यावर विधानभवनात मंतरलेली टीका

शेअर करा