मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhaskar Jadhav : पक्षात डावललं जातंय" — भास्कर जाधव यांचा मुखर introspection, निवृत्तीच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण

Bhaskar Jadhav : "शाखाप्रमुख बाजूला पडतोय हे पाहून खंत वाटते" — शिवसेनेच्या कार्यशिबिरात स्पष्ट मतप्रदर्शन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhaskar Jadhav : पक्षात डावललं जातंय" — भास्कर जाधव यांचा मुखर introspection, निवृत्तीच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण

 Bhaskar Jadhav : "शाखाप्रमुख बाजूला पडतोय हे पाहून खंत वाटते" — शिवसेनेच्या कार्यशिबिरात स्पष्ट मतप्रदर्शन

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव  Bhaskar Jadhav यांनी अलीकडेच दिलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राजकारणातून निवृत्तीचे संकेत देतानाच त्यांनी पक्षात डावलले जात असल्याची भावना स्पष्टपणे व्यक्त केली. कार्यकर्त्यांचे प्रमाण कमी होत असल्याचं त्यांनी मान्य केलं, मात्र त्यामुळे निवृत्ती घ्यावी असा विचार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भास्कर जाधव म्हणाले, “मला मंत्रिपद मिळायला हवं होतं. मी त्यावेळीही बोललो आणि आजही बोलतो. उद्याही बोलेन. मिळालं नाही म्हणून रडत बसायचं नाही, उलट लढायचं.”
तसंच त्यांनी स्पष्ट केलं की, "मी फुटून गेलेल्यांसोबतही गेलो नाही. मी पक्षाशी निष्ठावान राहिलो आहे."

मंत्रिपद न मिळाल्याची खंत, पण लढण्याची जिद्द कायम — शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटल्याची कबुली

शरद पवार यांना सोडल्याबद्दल त्यांनी थेटपणे कबुली दिली की, "त्या निर्णयाने चुकल्यासारखं वाटतं, पण त्याबद्दल खंत वाटत नाही. मी ते स्पष्ट केलं आहे." या विधानावरून त्यांनी अंतर्मुखपणे आपल्या राजकीय वाटचालीचा पुनर्विचार सुरू केला असल्याचं दिसून येतं.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले, "मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज असा संदेश संजय राऊत देतात, पण तसं काही नाही. मला व्यासपीठावर तिसऱ्या क्रमांकावर बोलायला संधी मिळते, याचंच समाधान आहे."
त्यांनी हेही नमूद केलं की, "शिवसेनेत पूर्वी शाखाप्रमुख हा कणा होता. पण आता काहीसं वेगळं चित्र आहे. शाखाप्रमुख बाजूला पडतो आहे, हे दिसून येतं."

आठ वेळा निवडून आलेल्या भास्कर जाधव यांनी शेवटी निवृत्तीबाबत स्पष्ट करताना सांगितलं की, "हे केवळ थकवा किंवा परिपक्वतेतून आलेलं विचारमंथन आहे. पक्षाकडून डावललं जातंय अशी नाराजी नाही, पण कार्यकर्त्यांना जपणं आवश्यक आहे."

शेअर करा