मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhandhup Suicide News : भांडुपमधील 31व्या मजल्यावरून मुलीचा मृत्यू — 'आत्महत्या'च्या कथेमागे हत्येचा उलगडा

Bhandup Suicide Case Updates : अभ्यासाचा ताण सांगणाऱ्या मित्राची कबुली फोल; पोलिस तपासात 'धक्का देणे' स्पष्ट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhandhup Suicide News : भांडुपमधील 31व्या मजल्यावरून मुलीचा मृत्यू — 'आत्महत्या'च्या कथेमागे हत्येचा उलगडा

Bhandup Suicide Case Updates : अभ्यासाचा ताण सांगणाऱ्या मित्राची कबुली फोल; पोलिस तपासात 'धक्का देणे' स्पष्ट

मुंबई, भांडुप | 23 जून रोजी भांडुपमधील एका उंच इमारतीच्या 31 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या 15 वर्षीय मुलीच्या प्रकरणात धक्कादायक वळण आलं आहे. प्रारंभी 'अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या' असा दावा करणाऱ्या मित्रानेच तिला धक्का दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून, या अल्पवयीन मित्रावर लवकरच हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे. Bhandup Suicide Case Updates

मृत मुलगी ही मुलुंड परिसरातील रहिवासी होती. 16 वर्षीय मित्राच्या भेटीसाठी ती भांडुप येथील एल.बी.एस. मार्गावरील एका टॉवरमध्ये गेली होती. त्यानंतर घडलेली घटना थरकाप उडवणारी ठरली. आधी सांगितल्याप्रमाणे, दोघे खाली उतरत असताना मुलीने उडी घेतली, असं मित्राने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, घटनास्थळ, साक्षीदार व मोबाइल फॉरेंसिक तपासातून सत्य वेगळंच समोर आलं.

घटनेनंतर भांडुप पोलिसांनी Bhandup Police Station अपघाती मृत्यूची नोंद केली होती, पण तपास अधिक खोलवर नेल्यावर मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी वस्तुस्थिती उजेडात आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी मुलगाही अल्पवयीन असल्याने जेजे कायद्याच्या अधीन राहून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली असून, अल्पवयीनांमध्ये निर्माण होणाऱ्या मानसिक तणाव व भावनिक संतुलनाबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे.

शेअर करा