मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

BEST Bus Mumbai : मुंबईत बेस्ट बसचे भाडे दुप्पट करण्याची तयारी, जाणून घ्या किती महागात पडणार प्रवास

• मुंबईतील बेस्टच्या बसच्या भाड्यात वाढ करण्याचा विचार केला जात आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

BEST Bus Mumbai : मुंबईत बेस्ट बसचे भाडे दुप्पट करण्याची तयारी, जाणून घ्या किती महागात पडणार प्रवास

• मुंबईतील बेस्टच्या बसच्या भाड्यात वाढ करण्याचा विचार केला जात आहे. सामान्य बससाठी किमान भाडे 10 रुपये आणि एसी बससाठी 12 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या सामान्य बसचे किमान भाडे 5 रुपये आणि एसी बसचे किमान भाडे 6 रुपये आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई :- बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) मुंबईतील एसी आणि नॉन एसी बसचे भाडे वाढविण्याचा विचार करत आहे. शासनाच्या मान्यतेनंतरच या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार असून सध्या त्यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बेस्टचे नवे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर. अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या श्रीनिवास यांनी गेल्या आठवड्यात भाडेवाढीच्या मुद्द्यासह सर्व बस ऑपरेशन्स आणि प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला.एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, भविष्यात बेस्टसाठी शाश्वत महसूल मॉडेल म्हणून भाडेवाढीचा विचार करू. बेस्ट परिवहन विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य (नॉन-एसी) बससाठी किमान भाडे 10 रुपयेआणि एसी बससाठी 12 रुपये वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

हेही वाचा: डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोझर चालणार, 6500 लोक जाणार कुठे?

शेअर करा