मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

बीड : बाल कल्याण समितीच्या भ्रष्ट सदस्य एसीबीच्या जाळ्यात!

Beed ACB Trap News : महिला बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता 50 हजारांची लाच प्रकरणी बालकल्याण समितीच्या सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी ताब्यात घेतले आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Bribe News

Beed ACB Trap News : महिला बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता 50 हजारांची लाच प्रकरणी बालकल्याण समितीच्या सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी ताब्यात घेतले आहे

बीड :- बाल कल्याण समिती Child Welfare Society सदस्य सुरेश प्रभाकर राजहंस (40 वय, रा. शिंदे नगर कॅनल रोड बीड) यांना लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले आहे. Beed ACB Trap लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड युनिटने कारवाई करत भ्रष्ट सदस्याला 50 हजार लाच प्रकरणी अटक केली आहे. बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता लाच मागितली होती. Anti Corruption Bureau Latest News

एसीबीने दिलेल्या माहितीवरून,तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता 18 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यावरून मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50 हजारांची लाच मागणी करून तडजोडांती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतःघेताना सुरेश राजहंस याना बाल कल्याण समिती चे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.शिवाजी नगर पोलीस ठाणे,बीड Beed Shivaji Nagar Police Station येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News

acb sp sandeep aatole

एसीबी पथक

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर पर्यवेक्षण अधिकारी -शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड सापळा पथक - पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि.बीड यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News

हेही वाचा: Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, 'काँग्रेसला आता समजलंय…'

शेअर करा