मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Baramati Accident : महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

• Baramati Accident बारामतीत पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Baramati Accident : महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

•Baramati Accident बारामतीत पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला आहे. काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्य याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

पुणे :- बारामती तालुक्यात भीषण रस्ता अपघात झाला आहे. बारामती राष्ट्रीय महामार्गावरील रुई लिमटेक रोडवर कारचा टायर फुटल्याने इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारचे चक्काचूर झाले.

बारामती तालुक्यातील रुई गावाजवळ मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य काटेवाडीहून रुईमार्गे बारामतीकडे येत होता. त्यांच्या चारचाकी गाडीचा टायर फुटून वाहन महामार्गावर पलटी झाले. यानंतर कार एका इमारतीच्या बाजूला जाऊन आदळली. या अपघातात आदित्य निंबाळकर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळ गाठून आदित्यला कारमधून बाहेर काढले.

जखमी आदित्यला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, अपघातात त्याला झालेली दुखापत खूप गंभीर होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आदित्यच्या मृत्यूमुळे निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेने संपूर्ण बारामती तालुक्यात शोककळा पसरली आहे.

शेअर करा