मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bapusaheb Pathare | वडगाव शेरी मतदार संघातील जनतेच्या मनातील 'आमदार' शरद पवारांच्या गोटात

bapusaheb pathare enters in sharad pawar ncp

M
mubarak

1 मिनिट वाचन

bapusaheb pathare

  • Bapusaheb Pathare | बापूसाहेब पठारे यांचा शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश
  • पुणे, दि. १७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Bapusaheb Pathare

    पुण्यातून भाजपचे विसर्जन करण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. वडगाव शेरी मतदार संघातील जनतेच्या मनातील 'आमदार' बापूसाहेब पठारे Bapusaheb Pathare यांना (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षात घेत पुण्यातील आणखी एक जागा शरद पवारांनी 'फिक्स' केली आहे. आज बापूसाहेब पठारे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी 'तुतारी' हातात घेत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

    महायुतीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समन्वय दिसून येत नाही. इच्छुक आणि प्रस्थापित आमदार यांच्यातील मतभेद दूर न झाल्याने अनेक ठिकाणी 'खटका' उडाला आहे. याच संधीच सोन शरद पवार करत आहेत. वडगाव शेरी मतदार संघात बापूसाहेब पठारे यांचे प्राबल्य आहे. पठारे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे.

    bapu pathare

    माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

    बापूसाहेब पठारे हे २००९ मध्ये पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यानंतर २०१४ साली भाजपाचे नेते जगदीश मुळीक हे आमदार झाले. त्या निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे बापूसाहेब पठारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्या भागातील प्राबल्य लक्षात घेऊन २०१९ निवडणुकीत भाजपाकडून बापूसाहेब पठारे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना भाजप नेतृत्वाने संधी दिली. मात्र त्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.या तीनही निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पाहता आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहिल्यानंतर भाजपाचे नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात परतण्याचे संकेत दिले होते.

    बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे यांचा शरद पवार पक्षात प्रवेश 🚩 (youtube.com)

    हेही वाचा: गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…!! मुंबईच्या राजाला निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन

    शेअर करा