मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल: "आयोगाचे उत्तर इतिहासातील सर्वात बोगस खुलासा!"

Balasaheb Thorat On Election : "मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका नको"; भाजपच्या 'मुक मोर्चा'वर थोरात यांचा निशाणा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल: "आयोगाचे उत्तर इतिहासातील सर्वात बोगस खुलासा!"

Balasaheb Thorat On Election : "मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका नको"; भाजपच्या 'मुक मोर्चा'वर थोरात यांचा निशाणा

मुंबई :- मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहार आणि मतचोरीच्या विरोधात आज (1 नोव्हेंबर) निघालेल्या 'सत्याच्या मोर्चा'मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आयोगाने दिलेले उत्तर फेटाळत त्यांनी आयोगाला 'इतिहासातील सर्वात बोगस उत्तर' ठरवले.

निवडणूक आयोगावर थेट आरोप

बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधींनी मतचोरी होत असल्याचे दाखवून दिले, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर थातूरमातूर होते. "आयोगाने कोणतीही चौकशी केली नाही, खुलासा केला नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत," असा थेट आरोप थोरात यांनी केला.

निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्या

निवडणूक आयोगाला केलेल्या मागण्यांबद्दल बोलताना थोरात म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली गेली, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरू नका, असे आम्ही आयोगाला सांगितले होते. आम्ही सर्व लोकशाही मानणारे नेते तिथे उपस्थित होतो. आम्ही अनेक उदाहरणे दिली, पण आम्हाला उत्तर मिळाले नाही."

सत्ताधाऱ्यांवर टीका

यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपच्या 'मुक मोर्चा'वरही टीका केली. "सत्ताधाऱ्यांनी मुक मोर्चा काढला. या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला आहे की काय, असे वाटते," असा उपरोधिक टोला थोरात यांनी लगावला. त्यांनी स्पष्ट केले की, विधानसभेच्या यादीत घोळ आहे आणि बोगस लोकांची नोंद आहे. त्यामुळे, या याद्या दुरुस्त झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, हीच त्यांची प्रमुख मागणी असल्याचे थोरात यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

शेअर करा