मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Badgujar Sudhakar : बडगुजरांचा भाजपप्रवेश आज; पण नेतेच अनभिज्ञ?

•ताफ्यासह मुंबईकडे प्रयाण, पक्षात स्वागताची तयारी; मात्र बावनकुळे, चव्हाण अनभिज्ञ!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Badgujar Sudhakar : बडगुजरांचा भाजपप्रवेश आज; पण नेतेच अनभिज्ञ?

•ताफ्यासह मुंबईकडे प्रयाण, पक्षात स्वागताची तयारी; मात्र बावनकुळे, चव्हाण अनभिज्ञ!

मुंबई | ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर आज दुपारी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र या प्रवेशावरच पक्षांतर्गत संभ्रम आणि नाराजीचे वादळ उठले आहे. सकाळी ताफ्यासह मुंबईकडे निघालेल्या बडगुजर यांनी भाजपकडून प्रवेशासाठी वेळ निश्चित केल्याचा दावा केला असला, तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “याची माहिती नाही” असे वक्तव्य केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

दुपारी 3 वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आशिष शेलार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार बडगुजर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विशेष जबाबदारी दिली जाणार आहे.

नाशिक भाजपमध्ये नाराजीचा सूर; स्थानिक नेत्यांकडून खुलेपणाने विरोध

दरम्यान, नाशिकमधील भाजप कार्यकर्ते आणि माजी पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. "बाहेरून आलेल्यांना झटणाऱ्यांवर मिळणारी पावती अन्यायकारक आहे" अशी भावना व्यक्त करत अनेकांनी पक्षनेतृत्वाकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे. “निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होत आहे,” अशीही टीका झाली आहे.

या संदर्भात सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “मी कोणाशी स्पर्धा करत नाही, सहकार्य घेऊनच काम करणार आहे. सुरुवातीला शंका असू शकतात, पण ती दूर करण्याचा प्रयत्न करेन.”

हेही वाचा: Panvel Waterfall News : धबधब्यांच्या मोहात जीव गमावू नका! – पनवेलमध्ये पोलिसांचा कठोर बंदोबस्त

शेअर करा