मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट

Bacchu Kadu Meet Raj Thackeray : बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना मराठवाड्यातील कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे दिले आमंत्रण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट

Bacchu Kadu Meet Raj Thackeray : बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना मराठवाड्यातील कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे दिले आमंत्रण

मुंबई :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यात काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे औपचारिक आमंत्रण दिले.

या आमंत्रणाला राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा राज ठाकरेंना अभ्यास आहे, पण 'शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत' ही त्यांची खंत असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी दिली. या भेटीतून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सर्व स्तरांवर संघर्ष करण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे ते म्हणाले.

या भेटीवेळी उपस्थित असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांना पाठवले होते आणि त्यांच्या 'चक्काजाम' आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद करण्याची बच्चू कडूंची भूमिका योग्य असून, त्यालाही आमचा पाठिंबा असेल, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

राजकीय युतीबद्दल बोलताना नांदगावकर म्हणाले की, प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहू नये, सध्या फक्त विचारांची देवाणघेवाण सुरू आहे. या भेटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा