मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Avinash Jadhav : मराठीच्या मुद्यावरून मनसेची दहीहंडी यंदा चर्चेत; अविनाश जाधवांच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Avinash Jadhav Dahi Handi : 'म… मराठीचा' उल्लेख करत मनसेने दहीहंडीला दिली भाषिक अस्मितेची जोड; ठाण्यात लक्षवेधी आयोजन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Avinash Jadhav : मराठीच्या मुद्यावरून मनसेची दहीहंडी यंदा चर्चेत; अविनाश जाधवांच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Avinash Jadhav Dahi Handi : 'म… मराठीचा' उल्लेख करत मनसेने दहीहंडीला दिली भाषिक अस्मितेची जोड; ठाण्यात लक्षवेधी आयोजन

ठाणे :- हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात वाद सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यंदाच्या दहीहंडी उत्सवाला मराठी अस्मितेची जोड दिली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी Avinash Jadhav Dahi Handi ठाण्यात आयोजित केलेल्या दहीहंडीच्या पोस्टरवर ‘म… मराठीचा’ असा सूचक उल्लेख केल्याने यंदाचा हा उत्सव राजकीय आणि भाषिकदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरून राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी याविरोधात भूमिका घेतल्याने अखेर सरकारला आपले निर्णय मागे घ्यावे लागले होते. याच काळात, मीरा-भाईंदर येथे मराठी बोलत नसल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांना अटक झाली होती. या घटनेनंतर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार आंदोलन केले होते. आता हाच 'मराठीचा मुद्दा' मनसेने दहीहंडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा उचलून धरला आहे.

यंदा 16 ऑगस्ट रोजी ठाण्यातील नौपाडा परिसरात भगवती शाळेच्या मैदानात अविनाश जाधव यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीच्या प्रसारासाठी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये 'म… मराठीचा' असा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच, 'मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी' मनसे दहीहंडी असाही संदेश देण्यात आला आहे.

या पोस्टरमुळे मनसेच्या दहीहंडीकडे केवळ गोविंदा पथकांचेच नव्हे, तर राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागून राहिले आहे. या उत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, मराठीच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पोस्टरवर तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात मराठीच्या मुद्यावरून मनसेची भूमिका अधिक आक्रमक राहण्याचे संकेत मिळत आहेत.

शेअर करा