Pimpri Crime News : वादात मध्यस्थी करणाऱ्यावर कटरने हल्ला
दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1 मिनिट वाचन

दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : गाडीत मटेरियल चुकीचे टाकल्याबद्दल सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर एका कामगाराने कटरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना निघोजे येथील इंपिरीयल ऑटो कंपनीच्या गेटवर घडली. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
विपुल शिंदे (वय २४, रा. निघोजे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कृष्णा दादाराव खिरकर यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विपुल हा फिर्यादीच्या हाताखाली काम करणाऱ्या विशाल सोनवणे याला गाडीत मटेरियल टाकण्यावरून शिवीगाळ करत होता. फिर्यादीने आरोपीला शिवीगाळ न करण्यास बजावले. या कारणावरून संतप्त झालेल्या विपुलने फिर्यादीला धमकावून त्याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १७) रात्री घडली. दक्षिण महाळुंगे या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.
Person mediating a dispute attacked with a cutter.
छायाचित्रे · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
Person mediating a dispute attacked with a cutter




